चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर,:-रिपब्लिकन चळवळीत नेताजी म्हणून ओळख असलेले आदरणीय नेताजी उर्फ विठ्ठल तु. बुरचुंडे यांचे दि. ४ जून २०२६ मौजा बोर्डा वरोरा येथे निर्वाण झाले. ते ८४ वर्षांचे होते.
नेताजी हे अगदी सुरुवातीपासून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात कार्यरत होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक भूमिहीन सत्याग्रह पुकारण्यात आला त्याचे नेताजी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सत्याग्रही होते.
नेताजी हे जेष्ठ आणि वरिष्ठ रिपब्लिकन नेते होते. हे पक्षाचे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष होते. वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चळवळीसाठी रिपब्लिकन जवान योद्धा म्हणून सतत धावपळ आणि मार्गदर्शन करत होते.
नेताजीना एक मुलगा आणि दोन मुली तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. नेताजी यांचा अंतिमसंस्कार तारीख ५ जून २०२६ ला त्यांच्या मूळ गावी मौजा माजरी ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे दुपारी ०२:०० वाजता पार पडला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष बाजीरावजी उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेऊन कार्यकर्त्यांनी नेताजींना विनम्र जयभीम करून आदरांजली वाहिली.
माजरी येथील मुक्तीधाम येथे नेताजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ आप्तपरिवार आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. नेताजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले तो दिवस म्हणजे ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस होता.


0 टिप्पण्या