Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर पोलिसांची तत्परता, 19 वर्षीय तरुणीचे प्राण वाचवले!

रेल्वे लाईनवर आत्महत्या करणार होती; प्रेमसंबंधातील नैराश्यातून टोकाचे पाऊल


राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर: चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका 19 वर्षीय तरुणीचे प्राण वाचले आहेत. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे रेल्वे लाईनवर आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरुणी सुरक्षित आहे.

दि. 30 जून 2026 रोजी दुपारी 5:30 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, एक तरुणी रेल्वे लाईनवर आत्महत्येसाठी जात आहे. या माहितीची दखल घेत पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तळवेकर आणि पोलीस अमलदार शशिकांत जिवतोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतले, जिचे नाव तनुजा वकील भडके, वय 19 वर्षे असे आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, प्रेमसंबंधातील नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. 
पोलिसांनी तातडीने तरुणीच्या आईला, सौ. संगम वकील भडके यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या ताब्यात मुलीला सुरक्षितरीत्या सोपवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

_______________________________________

🚆 चंद्रपूर पोलिसांनी वाचवले प्राण!

30 जून दुपारी 5:30 वा. रेल्वे लाईनवर आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय तनुजा भडकेला पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तळवेकर व अमलदार शशिकांत जिवतोडे यांनी वाचवले. प्रेमसंबंधातील नैराश्य हे कारण. मुलीला आईच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या तत्परतेला सलाम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या