Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग अस्थीव्यंग व्यक्तीसाठी शिबिराचे आयोजन, अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 नांदेड :-नायगाव तालूक्यातील अस्थीव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स वितरणाबाबत मोजमाप व तात्काळ वितरणासाठी "ऑन दी स्पॉट" शिबिरास अस्थीव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स मोजमाप घेऊन "ऑन दी स्पॉट "विनामूल्य वितरण करणे बाबत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे,
  तरी नायगाव तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना विनंती करण्यात येते की ज्यांना कृत्रिम हातपाय कॅलिपर्स व इतर साधनांची आवश्यकता आहे अशा गरजू अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तीने *दिनांक 04/07/2026 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत स्थळ जिल्हा परिषद शाळा नरसी नायगाव ता, नायगाव खै, जिल्हा नांदेड* या ठिकाणी खालील आवश्यक कागदपत्रासह  उपस्थित राहून आपल्याला आवश्यक आहे ते साधने हस्तगत करून घ्यावे. असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा नांदेड मा गोपीनाथ सांगवीकर मुंडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा कार्याध्यक्ष मा मारुती मंगरुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा सचिव मा राजेश बेळगे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा संपर्कप्रमुख मा चांदु आबंटवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नायगाव तालुका अध्यक्ष मा साईनाथ बोईनवाड व तालुक्याच्या वतीने केले आहे.
समाज सेवक, विजय चौडेकर,,

 आवश्यक कागदपत्रे :-
1) आधार कार्ड 
2) रेशन कार्ड 
3) दिव्यांगत्व  प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID)
4) उत्पन्न प्रमाण पत्र
5) पास पोट फोटो
नायगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या