Ticker

6/recent/ticker-posts

⭕ साकोलीत २३४ जणांनी घेतला आरोग्य लाभ •


◻️माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांचे वाढदिवसानिमित्त आयोजन ; वन विभाग - नगरपरिषद वतीने वृक्षारोपण 

चित्रा न्यूज नेटवर्क / आशिष चेडगे विशेष प्रतिनिधी 

◻️साकोली : माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त ( शुक्र. १० जुलै ) आयोजित आरोग्य शिबीरात एकुण २३४ जणांनी आरोग्य लाभ घेतला. यात नेत्र तपासणी चष्मे वाटप १२३, आरोग्य तपासणी १८२, नेत्र मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड ८० व एकुण १८ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले तर वनविभाग व नगरपरिषद वतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. 

◻️श्याम शुश्रुषा रूग्णालयात आयोजित आरोग्य शिबीर उद्घाटनप्रसंगी श्रीमती मिरा गुप्ता, शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार, नगराध्यक्ष देवश्री कापगते, उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे, अरूण बडोले, अखिलेश गुप्ता, जगन उईके, मुरलीधर कापगते, डॉ. छाया कापगते, डॉ. रविंद्र कापगते, आनंद सोनवाने, रामकृष्ण बोरकर, हुसन कापगते आदी उपस्थित होते. येथे एकुण २३४ जणांनी नोंदणी केली. डोळे तपासून १२३ चष्मे वाटप केले. विविध आरोग्य तपासणीत १८३ जणांचा लाभ तर ८० जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली व ते १३ जुलैला नागपुरला जाणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या रक्तदान शिबिरात १८ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. येथे जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. रचना बाजारे, खुशाल झाडे, मेघा पेंदाम, लोकेश गोटेफोडे, मेघा नागरे, काजल सेलोकर, अमर तायडे या चमुने आरोग्य सेवा दिली. याप्रसंगी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिश हुमने, डॉ. भास्कर गायधने, ता. आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक, डॉ. आशिष चिंधलोरे, डॉ. संतोष गाडगे, जि. प. सदस्य वनिता डोये, माहेश्वरी नेवारे, शकुंतला कापगते, धनवंता राऊत, भोजराम कापगते, ॲड. मनिष कापगते, नगरसेविका मिना लांजेवार, रेणू गणवीर, निर्मला नंदेश्वर, नगरसेवक इंजि. सपन कापगते, किशोर पोगडे, प्रमोद गजभिये, पंकज मुंगूलमारे, आशा शेंडे, भिमावती पटले, प्रितम कापगते, आशिक गणवीर, ललित खराबे हे हजर होते. 

◻️माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त वनविभाग, सामाजिक वनीकरण व नगरपरिषद वतीने साकोली सेंदूरवाफा शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. येथे वनविभागाचे वनरक्षक कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सदर आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गजानन डोंगरवार, प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, राजू कापगते, भागवत लांजेवार, मोरेश्वर गहाणे, बलराज नंदेश्वर, विवेक कापगते, चंदू कापगते, आशिष सेलोकर, देवनाथ रहांगडाले, रामकृष्ण बोरकर, व्हीआयपी ग्रुपचे अनिल कापगते, किशोर बावणे, अंकित कापगते, मनिष झिंगरे, चंद्रशेखर कापगते यांसह श्री सत्य साई सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले व हा सोहळा यशस्वी केला.

🟢 सामाजिक वनीकरण विभागाचे विशेष सहकार्य • 

शहरात वृक्षारोपण करणे व ती झाडे १००% टक्के जगविणे या संकल्पनेला वनविभाग, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक भंडारा प्रिया मलवे, वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, वनपाल डी. बी. दखने व सर्व वन कर्मचारींनी विविध ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करून हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या