Ticker

6/recent/ticker-posts

करंजेकर फार्मसी महाविद्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे १५ जुलै २०२६ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांचे विशेष सहकार्य या महारोजगार मेळाव्याला लाभणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जागतिक कौशल्य विकास दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात उमेदवाराच्या विविध कंपनीच्या प्रतिनिधी मार्फत मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखती करिता विविध नामांकित १५ कंपनीचे प्रतिनिधी या महारोजगार मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. यात वैभव एंटरप्राइजेस प्रा. लि. नागपूर, अशोक लेलँड गडेगाव ( भंडारा ), सनफ्लॅग स्टील ॲन्ड आयरन प्रा.लि. वरठी ( भंडारा ), न्यूबीनो हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड भंडारा, एसबीआय लाइफ इन्शुरन्स भंडारा, एमएमपी इंडस्ट्रीज मरेगाव भंडारा, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बँक नागपूर, युनिवर्सल ग्रुप नागपूर, पटले ग्रुप नागपूर, एलआयसी भंडारा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, फ्युजन फायनान्स लिमिटेड, अपॉर्च्युनिटी सॉफ्टवेअर भंडारा, श्रीराम फायनान्स, आयसा इंडिया सोशल असोसिएशन या कंपन्याचा समावेश आहे. या रोजगार महामेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, संस्था‌ अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, कौशल्य विकास अधिकारी विजय पांडव, जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक अविनाश खेडीकर, डॉ. लोकानंद नवखरे तथा बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रा. डॉ. आतिश शहारे. आणि समस्त प्राध्यापक वृंद यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या