Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरणवादी व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे धरणा आंदोलन


प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : नुकतेच तहसील कार्यालय भद्रावती येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे धरणा आंदोलन भव्य स्वरूपात करण्यात आले 
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष करण्यात आले.
 
 या निवेदनाच्या प्रति तहसीलदार मार्फत राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली -- पंत प्रधान भारत सरकार नवि दिल्ली -- जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. अभिजित दाबके व पर्यावरणवादी व समाजसेवक  सोनम वांगचुक यांनी देशातील विविध जनहिताच्या प्रश्नांसह विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनास  भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत.
देशभरात झालेल्या नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारने तसेच  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन देशातील विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा केली आहे.

दि.१८ जुलै २०२६ रोज शनिवारला पहाटे ५ वाजता पोलिसांच्या माध्यमातून जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत असून,  सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास व त्यांच्या जनहिताच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करीत आहोत असे सांगण्यात आले.

त्यामुळे आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, 

यावेळी निवेदन देतांना  कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन -- कॉम्रेड दिलीप वनकर -- कॉम्रेड शेख शकील -- कॉम्रेड सुनिल रामटेके -- कॉम्रेड श्रीराम पिदूरकर -- कॉम्रेड भगवान मांदाडे -- निशांत मेश्राम -- कॉम्रेड प्रदीप मांदाडे इत्यादी पदाधिकारी व कार्यक्रते हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या