Ticker

6/recent/ticker-posts

कलावंतांच्या मागण्यांसाठी भर पावसात भंडारा येथे संगीतमय आंदोलन


जनजागर कला साहित्य  व भंडारा  कलाकार  संस्थेचा उपक्रम  


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-जनजागर  कला साहित्य बहुउद्देशीय  संस्था साकोली व भंडारा कलाकार बहुउद्देशीय  संस्था यांच्या संयुक्त वतीने दि.२१ जुलै २०२६ रोजी त्रिमूर्ती चौक भंडारा येथे सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम  यांच्या नेतृत्वात भर पावसात  कलावंतांचे भव्य  संगीतमय  आंदोलन आयोजित  करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून संगीतमय रॅली ला सुरुवात झाली त्यावेळी सर्व कलावंतांकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्मृतिशेष प्रबोधनकार मनोज कोटांगले यांना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संगीतमय आंदोलनात कलावंत विविध वेशभूषा मध्ये आपली कला सादर करीत संगीतमय वातावरणात बऱ्याच गायक, वादकांनी  गाण्याच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली.भर पावसात देखील कलावंत न डगमगता मोठ्या संख्येने  संपूर्ण आंदोलन स्थळी पोहचले. त्यावेळी त्रिमूर्ती चौकात कलावंतांच्या आंदोलन विषयी ज्येष्ठ कलावंत व  माजी जि. प.सदस्या भूमाला उईके , कवी साहित्यिक नाशिक चवरे, प्रबोधनकार सुभाष कोठारे, प्रबोधनकार भावेश कोटांगले व आंदलनाचे नेतृत्व करणारे परमानंद मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनातील प्रमुख मागण्यामध्ये २०२५ -२६ मधील मानधन लाभार्थी निवड एक वर्ष होऊनही अद्याप कलावंत निवड झालेली नाही ती तात्काळ करण्यात यावी,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन समिती अध्यक्ष हे  कलावंतांमधूनच असला पाहिजे,कलावंतांना आरोग्य विमा लागू करा, मानधन कलावंत निवड ही जिल्ह्यामधून किमान ५०० कलावंतांची  निवड करावी,कलावंतांच्या गाडीला टोल नाका मोफत  असायला पाहिजे, मानधन कलावंतांची वय ही ४५ वर्षे असावी, प्रत्येक तहसिल मधून निवड करतांना कलावंतांचा निकष  ठरलेला असावा उदा.नाटक, वादक, पेंटर, तमाशा, गोंधळ, दंडार,भजन या क्षेत्रातील कलावंत किती निवडायचे हा निकष असला पाहिजे,प्रत्येक कला क्षेत्रातील नामांकित कलावंत/राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय अशा कलावंतांची मानधन समितीवर निवड करावी, या व  इतर मागण्यांचा समावेश असणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.निवेदन देतांना परमानंद मेश्राम, भूमाला उईके, नाशिक चवरे, सुभाष कोठारे, भावेश कोटांगले, गणेश आथिलकर, नत्थु बांते, कार्तिक मेश्राम, उमेश भोयर, निलाराम बागडे, अतुल कानतोडे, लक्ष्मीकांत मेश्राम, संदिप कोटांगले, गुड्डू बोरकर,सोनू मेश्राम, करिष्मा भाग्यवंत, अर्चना कान्हेकर, प्रतिभा साखरे, वनश्री श्राध्ये, तेजस कोटांगले आदी कलावंत  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या