चित्रा न्युज प्रतिनिधी
लातुर-हाळी-हंडरगुळी येथून गेलेल्या उदगीर-अहमदपुर राज्यमार्गावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे येथे सदासर्वदा होत असलेल्या वाहतूक कोंडीने वाहनधारक,पदचारी ञस्त झाले आहेत.यामुळे अशांतता पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे येथे छोटे,मोठे वाद होताना दिसतात.म्हणुन कायदा व सुव्यवस्था कधीपण धोक्यात येऊ शकते.तेंव्हा राज्यमार्गावर वाढलेले अतिक्रमण हटविणे आणि थांबलेल्या बेशिस्त वाहनधारकांना लगाम लावणे गरजेचे असताना अद्याप तसा प्रयत्न होत नाही.तेंव्हा कायदा, सुव्यवस्था धोक्यात आल्यावर संबंधित यंञणा लगाम घेऊन ग्राऊंडवर येणार का?असा सवाल हाळी-हंडरगुळीकरातुन चर्चीला जातोय.
अधून-मधून येथे येणा-या ट्रॅफीक पोलीसालाच कांही वाहनधारक खडेबोल ऐकवतात.म्हणुन कारवाईची धमक कोणताच अधिकारी दाखवित नाही.अशी चर्चा आहे.
येथील उदगीर-अहमदपुर जाणा-या रोडवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे व बेशिस्तीत थांबणा-या गाड्यांमुळे वर्षानुवर्षा पासून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असतो तरीही यावर नियंञण ठेवणारी कसलीही यंञणा येथे कार्यरत नाही.हे जनतेचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.म्हणुन या रोडवर नेहमीच होते ट्रॅफीक जॅम!
तेंव्हा येथे एखादा मोठा अपघात झाल्यावर तसेच अशांतता निर्माण झाल्यावरच वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याऐवजी तसेच अतिक्रमण काढण्याऐवजी वरिष्ठांनी अशातच याकडे लक्ष दिले तर बरे होईल. असा सुर ऐकू येतोय.


0 टिप्पण्या