संघटनात्मक ताकद सिद्ध; तहसीलदारांकडे अधिकृत यादी सादर
राजेश येसेकर चित्रा न्युज
चंद्रपूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघ क्रमांक 75 मधील 100% बूथ लेव्हल एजंट BLA नियुक्तीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या सर्व BLA यांची अधिकृत यादी आज संबंधित तहसीलदार साहेबांकडे नियमानुसार सादर करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा पक्षाने वेळेत पूर्ण केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ ताजने, तालुकाप्रमुख नरेश काळे, भद्रावती शहरप्रमुख बंटी हेमके, माजरी शहरप्रमुख राहुल तलावार, माजरी युवासेना शहरप्रमुख साईकिरण संध्यावाणी, गोलू गेडाम उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक बूथवर पक्षाची भक्कम उपस्थिती निर्माण करून शिवसैनिक पूर्ण ताकदीने जनतेच्या सेवेसाठी आणि पक्षाच्या विजयासाठी सज्ज असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
"बूथ मजबूत तर पक्ष मजबूत" या ध्येयाने शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
___________________________________
वरोरा-भद्रावतीत ठाकरेंची 100% BLA नियुक्ती पूर्ण!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वरोरा-भद्रावती 75 मतदारसंघातील प्रत्येक बूथवर एजंट नेमले. यादी तहसीलदारांकडे सादर. जिल्हाप्रमुख भास्कर ताजने म्हणाले - 'बूथ मजबूत तर पक्ष मजबूत'. आगामी निवडणुकीसाठी संघटना सज्ज.


0 टिप्पण्या