Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलच्या मदतीने सात गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी: पोलीस स्टेशन वाढवणा, ता. उदगीर येथील पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करून एकूण सात गहाळ मोबाईल शोधून काढले. शोधण्यात आलेले मोबाईल अनब्लॉक करून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस स्टेशन वाढवणा येथे गहाळ नोंद क्र. 04/25, 15/24, 44/24, 54/24, 64/24, 31/24 व 22/26 अशा एकूण सात प्रकरणांतील मोबाईलचा शोध घेण्यात आला. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली CEIR पोर्टलच्या सहाय्याने करण्यात आली.
या प्रकरणातील दृष्टीहीन नागरिक धनवंत दिगंबर वाघमारे, रा. लाळी, ता. जळकोट यांच्यासह इतर नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
दीर्घकाळ हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने धनवंत वाघमारे यांच्यासह सर्व लाभार्थ्यांनी जिल्हा पोलीस दलाचे व वाढवणा पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर नोंद करून जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या