डॉ. भास्कर गायधने हे काँग्रेस पक्षाचे ?
रोखठोक: रवि भोंगाने
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर गायधने यांचा ९ जुलैचा वाढदिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि असतो. ते आपल्या वैयक्तिक पातळीवर आपल्या परीने साजरा करीत असतात, करावे या दुमत नाही. परंतु साकोलीच्या सोशल मीडियावर डॉ.गायधने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैशाली लांजेवार यांची फोटो झनकलाल लांजेवार यांच्याकडून व्हायरल केली गेली. नगरसेवक हे पद जबाबदारीचे पद आहे. शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक वाढदिवसाचे अभिनंदन सोशल मीडियातून किंवा प्रसिद्धी माध्यमातून करता येत नाही. शासकीय अधिकारी, कर्मचारी कधी कुणाची खाजगी मालमत्ता नसते. चला एक उदाहरण घेऊ या. आजच्या तारखेत सुपरस्टार असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा वाढदिवस आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांची सोशल मीडिया किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून अभिनंदन करतील काय ? किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस असेल तर तुकाराम मुंढे हे जाहीररित्या वृत्तपत्र किंवा सोशल मीडियातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील काय ? नाही. अजिबात नाही तसे होणार नाही. आणि तसे करताही येत नाही. कारण त्याचा एक प्रोटोकाल असतो. वैयक्तिक हितसंबंध खाजगी पातळीवर मॅनेज करावे लागतात. डॉ. भास्कर गायधने हे काँग्रेस पक्षाचे म्हणून इतर पक्षांच्या बाबतीत गैरसमज निर्माण झालेला आहे. डॉ. गायधने यांच्या परिवाराने नगरपरिषद निवडणुकीसाठी वैशाली लांजेवार यांना सहकार्य केले म्हणून पुळका आला का ? हा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे. डॉ. भास्कर गायधने शासकीय उपजिल्हा रुग्णातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक आहेत. ते शासनाची नोकरी करतात आणि शासकीय वेतन उचलतात. ते कुठलेही राजकीय प्रतिनिधी नाहीत. राजकीय व्यक्ती जाहीररित्या स्वतःचा फोटो टाकून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रसिद्धी माध्यमातून अभिनंदन करू शकत नाही याचे भान नगरसेविका वैशाली लांजेवार यांना राहिलेले नाही. वैशाली लांजेवार यांनी डॉक्टर भास्कर गायधने यांचा जाहीररित्या अभिनंदनचा फोटो टाकून ते काँग्रेस प्रणित असल्याचा संदेश भाजप, शिवसेना आणि इतर पक्षाकडे दिला. याबाबतीत अनेक प्रतिक्रिया आता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीकडे येऊ लागलेल्या आहेत. वैशाली लांजेवार नगरसेविका होण्यापूर्वी आम्हीच उच्चशिक्षित महिला उमेदवार म्हणून त्यांच्यावर लिहिले होते. आणि त्याच प्रभागातील नागरिकांनी या मुलाखतीचा अभ्यास करून नागरिकांनी त्यांना निवडूनही दिले. परंतु नगरसेविका लांजेवार यांची एक चूक डॉ. भास्कर गायधनी यांच्या बाबतीत इतर पक्षात चुकीचा संदेश देऊन गेली. प्रत्येक अधिकारी कर्मचारी हे वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित असतात. त्यांचे भावनिक, कौटुंबिक संबंध असतात आणि असायलाही पाहिजे. पण त्यांची जाहिररित्या वाच्यता करता येत नाही. साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्यावर अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रेम आहे. परंतु त्यांनी कधीही आमदार नाना पटोले यांची प्रसिद्धी माध्यमातून कधीही वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनंदन केलेले नाही. किंवा आमदार नाना पटोले यांनी सुद्धा आपल्यावर प्रेम करीत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसाची जाहीररीत्या कधीही वाच्यता केलेली नाही. आमदार नाना पटोले यांच्या पक्षात असलेल्या प्रतिनिधींना याचे भान असू नये ? आम्ही २५ वर्षाच्या पत्रकारितेत अनेक अधिकाऱ्यांची आणि अनेक कर्मचाऱ्यांचे राजकीय नेत्यांशी साटेलोटे पाहिलेले आहेत. पण त्यांनी कधीही जाहीररित्या त्यांची वाच्यता केली नाही. कारण ते करता येत नाही. परंतु हळद्या हळकुंडात पिवळे झालेल्या नगरसेविका यांना मात्र त्या गोष्टींचा विसर पडला. विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर गायधनी यांनी आपली ही सोशल मीडियावरची जाहिरात बघतांना डिलीटकरण्या विषयीच्या सूचना देण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही. साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद प्रभाग क्रमांक १ मधील वैशाली लांजेवार ह्या काँग्रेस पक्षाने दिलेल्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका आहेत हे त्या विसरून गेल्यात. डॉ. भास्कर गायधनी हे शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत हे सुद्धा त्या विसरून गेल्यात. आपण नगरसेविका नसत्या आणि फोटो टाकून शुभेच्छा दिल्या असत्या तर बिघडलेही नसते. पण आपण एका पक्षाचे राजकीय प्रतिनिधी आहात आणि डॉ. हे शासकीय अधिकारी आहेत. आता या शुभेच्छांमुळे काँग्रेस प्रणित दाखविल्या गेलेले डॉ. भास्कर गायधनी यांची उचलबांगडी झाली तर त्याला जबाबदार कोण ?


0 टिप्पण्या