चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची जनावरे चोरणारे टोळीचा वाढवणा पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 100000/- इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे.तसेच चोरीकरिता वापरलेला एक महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप किंमत 2,50000 असा एकूण 350000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाढवणा हद्दीत सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपाधिक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पो स्टे चे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री.सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.गुप्त माहिती संकलन, संशयितांवर पाळत आणि गोपनीय तपास करून या टोळीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनी यश मिळविले.
अटक आरोपीची नावे
१)खय्युम महताब खुरेशी वय 25(रा. वाढवणा ता. उदगीर जि लातूर
2)शंकर नंदकुमार पुंड वय 28 रा. डोंगरशेळकी
३)शाहरुख शादुल पिंजारी वय 24 रा वाढवणा खुर्द या तिघांना ताब्यात घेतले.
४) सादिक खाजामिया खुरेशी रा. वाढवणा बु ता. उदगीर (फरार )
हा साथीदार पसार झाले असून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विविध गुन्ह्यांतील तपशील समोर ठेवल्यानंतर आरोपींनी जनावरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींनी डोंगरशेळकी येथील बैल,म्हशी चिद्रेवाडी येथील गाय, म्हशी, आदी जनावरे चोरी करून विक्री केल्याचे कबूल केले.या गुन्ह्यांची उकल करण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेली 100000/- इतकी रोकड ही जनावरे चोरी करून विक्रीतून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रकमेचा पंचनामा करून ती गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आली आहे.या उल्लेखनीय कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून जनावरे चोरीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या सूचना व निर्देशांवर तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.सुनील गायकवाड , यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो ह/संजय कलकत्ते,गजानन पुल्लेवाड, शिवप्रताप रंगवाळ,शिवाजी केंद्रे, मधुकर कारलेवाड,संभाजी गाडगे, दत्तात्रय वाडकर, शिवाजी कांगणे, प्रणाली गायकवाड यांनी केली आहे.


0 टिप्पण्या