Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर:-जीवन प्रयाग फाऊंडेशन उदगीर व श्री प्रेमला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने राष्ट्रीय विद्यालय, उदगीर येथे डॉ. अश्विनी दळवे  यांच्या  जन्मदिनानिमित्त व्याख्यान व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या व्याख्यान व साहित्य वाटप कार्यक्रमात मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. उमाकांत स्वामी, प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते श्री. दयानंद कांबळे, प्रमुख पाहुणे श्री. राजकुमार कानवटे, डॉ. अश्विनी दळवे , कार्यक्रम प्रमुख क्षितिज जाधव उपस्थित होते. 

 प्रमुख वक्ते बोलताना श्री. दयानंद कांबळे म्हणाले आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आपणाला शाळेमध्ये पाठले आहेत आपण त्या आई-वडिलांच्या जीवनाचं काहीतरी भलं केलं पाहिजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ज्याप्रमाणे जीवन फाउंडेशन कार्य करत आहेत येणाऱ्या काळात आपणही कार्य केलं पाहिजे आपल्याविषयी कोणीतरी बोललं पाहिजे असे उत्तम नागरिक आपण झालं पाहिजे असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप करतेवेळी मुख्याध्यापक श्री. उमाकांत स्वामी यांनी असे मत व्यक्त केले की ज्याप्रमाणे बाबा आमटे यांनी समाजासाठी कार्य केले आहे त्याप्रमाणेच जीवन प्रयाग फाऊंडेशन कार्य करण्याचे प्रयत्न करत आहे. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार पद्माकर गुडसुरकर मानले. यावेळी  ए पी पोतदार, एम आर पाटील ,आर बी आचकूलवार, सौ. यू वाय मोघेकर, श्री  प्रेमला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश पांढरे, सार्थक डावळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या