चित्रा न्युज प्रतिनिधी 
(किल्लारी) -----भारताच्या स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्तिसंग्रामामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मोठे योगदान होते. 
ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पत्री सरकारच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटलाने प्रखर विरोध केला. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी क्रांतीसिंहाने सरकारच्या विरोधात लढा दिला. असे मत डॉ.संजय मोरे यांनी व्यक्त केले. किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयात कॉ. क्रांतीसिंह नाना पाटील यांची १२६ वी. जयंती यावेळी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 
 धिप्पाड शरीरयष्टी, दमदार पहाडी आवाज, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट संसद पट्टू असे व्यक्तिमत्व नाना पाटलांचे होते. विठ्ठलाच्या भक्ती बरोबरच राष्ट्रभक्ती त्यांच्यात ठासून भरलेली होती. असेही त्यांनी सांगितली.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक- प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.