Ticker

6/recent/ticker-posts

जांभळी येथे सहस्त्रचंद्रदर्शन गौरव सोहळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-नवयुवक शिक्षण संस्था जांभळी / सडक संस्था सचिव होमराजभाऊ कापगते तथा संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनात सहस्त्रचंद्रदर्शन सत्कार तथा गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. नवयुवक शिक्षण संस्था अध्यक्ष जासवंत कापगते वयाची ८१ वर्षे पूर्ण केल्याने आणि नवयुवक शिक्षण संस्था संचालिका डॉ. प्रीती कापगते ( हातझाडे ) यांना गोंडवाना विद्यापीठतर्फे आचार्य पदवी प्रदान करण्यात आल्याने जांभळी( सडक ) येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात नवनियुक्त विधानपरिषद आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्यासुद्धा सत्कार सोहळ्याच्या समावेश आहे. याप्रसंगी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी आमदार राजेश काशीवार, जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदियाचे संचालक गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य वनिता डोये, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया जयश्री देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे, जिल्हा मध्यवर्ती बँक भंडाराचे संचालक धर्मराज भलावी, कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव सभापती डॉ. उमाकांत काशीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली डॉ. विनोद नाकाडे, डॉ. प्रभाकर गहाणे, जीवन संस्था लाखनी अध्यक्ष धनंजय तिरपुडे,  श्याम शिक्षण संस्था अध्यक्ष खोडशिवनी शामराव मस्के ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला अधिकाअधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नवयुवक शिक्षण संस्था सचिव, माजी प्राचार्य तथा पंचायत समिती सदस्य होमराज भाऊ कापगते तथा समस्त संचालक मंडळ यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या