Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८ जणांवर कारवाई,२ फरार, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त​

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर-आयजी व एसपी साहेबांच्या आदेशावरुन वाढवणा पोलिस 'अॅक्शन मोड व ग्राउॅंड' वर आले असून मिळालेल्या माहितीच्या आधारे दि.२४-८-२६ रोजी सायं.६.३० वा.हंडरगुळी शिवारात शेत.स.नं.९४/२ मधील पञी शेड समोर  बिनधास्तपणे चालू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर सपोनी.सुनील गायकवाड यांनी शिवप्रताप रंगवाळ,प्रणाली गायकवाड,दत्ताञ्य वाडकर, गौसभाई शेख यांच्या साथीने अचानक 'सर्जिकल स्ट्राईक' केला व बेकायदेशीर 'तिर्रट' जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. 
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ८ जुगा-यांवर मुंजुकानुसार कारवाई करुन ताब्यात घेतले, तर २ आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले.या आरोपींकडून रोख रक्कम,५ मोटार सायकल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​पोलीस प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.या प्रकरणी एस.बी.कांगणे (पो.काॅ) यांनी फिर्याद दिली म्हणुन आरोपी अफसर आजमोद्दीन शेख रा.हंडरगुळी,इब्राहीम हिराजी चौधरी हंडरगुळी, केशव किशनराव माने हाळी,जावेद इसाक शेख हाळी,चांद याकूब शेख हंडरगुळी,अरुण भोसले हंडरगुळी,एजाज शौकत चौधरी हंडरगुळी (फरार),सचीन नरसींग लोंढे हाळी (फरार) या ८ आरोपींवर गुरनं,कलम- २६०/२६ कलम-१२ (अ)मुंजुकान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोकाॅ.९६५ गाडगे हे या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी.सुनील गायकवाड,पोउनी. प्रवीण हालसे यांच्या मार्गदर्शनाखाली करतात.यापुढे ही परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा सपोनी.एस. पी.गायकवाड,पोउपनी.प्रवीण हालसे यांनी दिला आहे..
*या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये 'खाकी' ची 'दहशत' बसली असलीतरी ही हाळीत चालत असलेल्या त्या 'महालातील' 'पप्लू' जुगारावर कारवाई का करत नाहीत.अशी कुजबूज सुज्ञ हाळीकर जनता करत आहे.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या