Ticker

6/recent/ticker-posts

करंजेकर फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचलित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा बी. फार्म आणि डी. फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आतिश शहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. चंद्रशेखर चकोले उपस्थित होते. सदर कार्यशाळेला नांदी फाउंडेशनचे महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे देवनात पिल्लई आणि प्रतीक कांबळे यांनी मार्गदर्शन केले. ७ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन गजभीये यांनी केले. सात दिवसाच्या कार्यशाळेत जीवन कौशल्य, मुलाखत कौशल्य, संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि इतर विषयावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्य शाळेला भरपूर प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समस्त पदवी आणि डिप्लोमा विभागाच्या समस्त प्राध्यापक वृंद्रांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक सचिन गजभिये, संचालन गीतांजली गडपायले तर आभार पल्लवी मस्के यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या