Ticker

6/recent/ticker-posts

लाखोरी येथे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुभाष सावरकर यांची फेरनिवड


सर्वानुमते निवड, व्यसनमुक्त गावाचे आश्वासन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी (श.प्र.) :तालुक्यातील लाखोरी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुभाष माणिक सावरकर यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.तंटामुक्ती समितीचे पुनर्गठन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात दि.18 ऑगस्टला ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुधीर चेटूले होते.विषयसूचीनुसार अध्यक्षपदासाठी गावातील समाजसेवी सुभाष सावरकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे ग्रामसभेत सर्वानुमते त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. यापूर्वीही त्यांची 25 ऑगस्ट 2025 रोजी या पदावर अविरोध निवड झाली होती. यावेळी उपसरपंच दिवाकर बांते, ग्रामपंचायत अधिकारी योगेश माटे, पं.स. उपसभापती सुनील बांते, ग्रा.प. सदस्य विलास बांते, रजत शिंगणजुडे, मनोज रामटेके,पुनेश्वर सिंगणजुडे विविध सेवा सह. संस्था अध्यक्ष, रवीभाऊ शिंगणजुडे जवाहर भात गिरणी अध्यक्ष, सा. कार्यकर्ता अशोक बडवाईक, मुख्याध्यापक, शिक्षक व मोठ्या संख्येने गावकरी आणि महिला उपस्थित होत्या.सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष सावरकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नवनियुक्त अध्यक्ष सुभाष सावरकर यांनी 3 हजार लोकसंख्या असलेल्या गावाला व्यसनमुक्त करण्याचा आणि गावकऱ्यांना निष्पक्ष न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या