चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड -"मागच्या वर्षी विद्यालयाने जागतिक विश्व रेकॉर्ड करून एक लाख युनिट रक्त संकलन केले " प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मा. मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाश मनीजी जी यांच्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन आमदार बालाजी कल्याणकर , समाजसेविका सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे, शिवसेना नेते धोंडू पाटील, कृषीभूषण भगवानभाई इंगोले यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. मानवतेची सेवा, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ जीवनदान आहे, सामाजिक बांधिलकी, आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जन माणसात पोहोचण्यासाठी ब्रह्माकुमारीज समाजसेवा प्रभाग विश्वबंधुत्व रक्तदान अभियान २०२६ अंतर्गत ब्रह्मकुमारीज वसंत नगर नांदेड यांच्या वतीने 41 युनिट रक्तदान संकलित करण्यात आले . यावेळी स्वाती बहिणजी म्हणाल्या रक्ताला धर्म, जात ,भाषा, सीमा, नसते व्यक्तीने केलेले रक्तदान अनेक गरजू रुग्णांच्या जीवनासाठी आशेचा किरण ठरू शकते रक्तदान हे जीवनदान आहे या भावनेतून ब्रह्मकुमारीज परिवाराने जास्तीत जास्त रक्तदान करावे रक्तदान हे केवळ दान नसून मानवते प्रती प्रेम, करुणा, आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आव्हान ब्रह्मकुमारीज वसंत नगर नांदेड च्या संचालिका ब्रह्मकुमारी स्वाती बहिण जी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी मिना बहिणजी , वंदनाबहिण जी, सत्या बहिण जी, ,बीके साईनाथ भाई, रमाकांत भाई, मुरली भाई, दत्ता भाई तिडके, ठाकूर भाई, विद्यालयातील भाऊ-बहिणींनी परिश्रम घेतले


0 टिप्पण्या