Ticker

6/recent/ticker-posts

कोहळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ९ ऑगस्ट रोजी


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- गत ३० वर्षांची परंपरा अविरत  कायम राखत यंदाही  भंडारा येथील कोहळी समाज विकास मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च २०२६ च्या  इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत कोहळी  समाजातील प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ  रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी  भंडारा येथील इंद्रलोक सभागृहात आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व पाहुण्यांचे स्वागत  बक्षीस पुरस्कर्ते व दानदाते यांचे स्वागत गुणवंतांचा सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन, गुणवंतांचे व पालकांचे मनोगत, आभार प्रदर्शन व  स्वरुची भोज असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी नागपूर येथील  से. नि. अभियंता व प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी वामनराव खुणे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती येथील रिजनल फॉरेन्सीक सायन्स लेबॉरेटरीचे सहाय्य्क संचालक  केशव कापगते असतील.मार्गदर्शक म्हणून गडचिरोली येथील  गोंडवाना  सैनिक विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे असतील. प्रमुख उपस्थितीत माजी आ.डॉ. हेमकृष्ण कापगते, से. नि. अभियंता  उमाशंकर पर्वते, कोहळी समाज विकास मंडळ नागपूरचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे आदी मान्यवर उपस्थित असतील. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत लंजे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. पतिराम डोंगरवार, सचिव डॉ. राजेश कापगते, सहसचिव प्रा. डॉ. खुशाल बोरकर, कोषाध्यक्ष संजय खुणे तसेच सर्व सभासदगण यांनी केले आहे. सदर सत्कार सोहळ्यात ओजस नाकाडे (९१. ४०), जयश्री सोनवाने(९१), अस्मिता गौपाले (९१), कौशल देशमुख (९०.६०), गुण लंजे (८९. ४०), वैष्णवी गौपाले (८८. ६०), ओमकार देशमुख (८६. ५०) आयुष बोरकर (९५. ८३), दिक्षा झोडे (९५. ६०), चैतन्य डोंगरवार(९५. ५०), परिणिता नाकाडे (९५. १६), ललीत  पर्वते (९४. ८३), संजीवनी बोरकर (९४. ५७), उत्कर्ष नाकाडे (९४. ५७), मयंक पुस्तोडे (९४. ५०), अगस्त्त्य लांजेवार (९४. ४०), युक्ती गहाणे (९४. १४), यश गौपाले (९४), राधिका कापगते(९३. ८३), भारवी डोंगरवार (९३. ५०), श्रुती लोंढे(९३. १६), शुभम नाकाडे (९३), आर्या लंजे (९२. ८०), आयुषी बुद्धे (९२. ६६), कौस्तुभ गहाणे (९२. ८०), चैताली कापगते (९२. ६६), कल्पक पुस्तोडे(९२. ४०), तिलक पुस्तोडे (९२. ३३), हिमांशु रुखमोडे (९२. ३३), उपेक्षा बोरकर(९२. १६), शितल खुणे(९२), जैस्मीन पुष्पतोडे(९२) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या