Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत "पोलिस-विद्यार्थी संवाद" उपक्रमवाढवणा ठाण्याअंतर्गत शाळा,ज्यू-काॅलेज मध्ये B.N.S.विषयी मार्गदर्शन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर:-लातुर जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याभरात "पोलिस-
विद्यार्थी संवाद" हा उपक्रम राबविला जात असून या अनुषंगाने पो.स्टे.वाढवणा बु.हद्दीत सपोनि.
सुनील गायकवाड यांच्यासह पोलिस स्टाफ हा स्तूत्य उपक्रम राबवित असून दि.३ रोजी दु.२ वा.
शिवाजी मा.उच्च मा.विद्यालय,हंडरगुळी येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सपोनि.सुनील गायकवाड,हेड.काॅ.एस.रंगवाळ व मु.अ.तांबरे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन मान्यवरांनी केले.
मग शाळेतर्फे सपोनि.सुनील गायकवाड,हेडकाॅ. एस.के.रंगवाळ,हे.काॅ.दत्ताञ्य वाडकर,मधूकर कार्लेवाड,जेष्ठ पञकार पप्पू पाटील यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक घटकार सरांनी केले. तर सुञसंचालन मोमीन सर यांनी व आभार नाटकरे सर यांनी मानले.
यावेळी मु.अ.तांबरे सर,स्काऊट टिचर बालाजी सागवे सर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कायद्याबद्दलची सर्व डिटेल माहिती विद्यार्थ्यांना व्हावी.म्हणुन जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेने व डीवायएसपी.अरवींद रायबोले यांच्या सुचनेने सपोनि.सुनील गायकवाड हे स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे,सोशल मीडिया,स्व-सुरक्षा,वाहतुक कायद्याविषयी योग्य ते मार्गदर्शन करत आहेत.

पोलिस अधिक्षक साहेबांनी 'पोलिस-विद्यार्थी' संवाद हा अभिनव उपक्रम सुरु केला असून दि. १/८/२६ पासून या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटले पाहीजे तसेच पोलिसांबद्दल भीती ऐवजी विश्वास वाटला पाहीजे.या उपक्रमामुळे 'पोलिस आणि विद्यार्थी' यांच्यात संवादाचा चांगला सेतू तयार व्हावा,तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापेक्षा अभ्यासात 'अॅक्टीव' राहून चांगले संस्कारक्षम नागरीक बनावे.हा हेतू आहे. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नये,कोण्याही पालकांनीही अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये.अन्यथा कारवाई करण्यात येईल.तसेच सायबर फ्राॅड व क्राईम सह विद्यार्थ्यांनी विशेषत: मुलींनी स्वत:ला होणारा ञास सहन न करता बिनधास्तपणे डायल११२ वर किंवा प्रत्यक्षात भेटून तक्रार द्यावी.तक्रारकर्त्यांच्या नावाची गुप्तता ठेवून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
सुनील गायकवाड,सपोनि.वाढवणा

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा,तसेच आपली अडचण सांगावी.आम्ही सदैव जनसेवेसाठी तत्पर आहोत.वाढदिवसाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी राञी उशीरा होणारा धिंगाणा तसेच मोठमोठ्या आवाजात राञी १० नंतर वाजणारे भोंगे यामुळे सामाजिक वातारण दुषित होत असून असे प्रकार ज्या गल्ली-काॅलनीत होत असतील तर न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा,कायदा मोडणा-यांवर नक्कीच कारवाई केली जाईल.
एस.के.रंगवाळ,बीट जमादार,हंडरगुळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या