Ticker

6/recent/ticker-posts

नान्नज कडकडीत बंद ठेऊन उपोषणास गावकऱ्यांचा पांठींबा...लवकर मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा..राजेंच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098/9615179615

जामखेड :- नान्नज गावच्या प्रलंबीत मागण्यासाठी शहाजी राजेंनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून तिसऱ्या दिवशी नान्नज ग्रामस्थाच्या वतीने संपुर्ण गाव कडकडीत बंद ठेऊन या उपोषणास पाठींबा दर्शवण्यात आला असून लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास या पेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज गावच्या प्रलंबीत प्रश्ना संदर्भात कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा नान्नजचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांनी दि 7 ऑगस्ट पासून अमरण उपोषण चालू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून गेल्या दोन दिवसात त्यांच्या या आंदोलनास अनेक पक्ष संघटना व ग्रामस्थांचा वाढता पाठींबा मिळत असून त्यातच आज स्थानिक दुकानदार व्यापारी व ग्रामस्थाच्या वतीने नान्नज गाव कडकडीत बंद ठेऊन उपोषणास पाठींबा देत लवकर मागण्या पुर्ण करण्याची विनंती करण्यात आली असुन त्वरीत मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढेही तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या