Ticker

6/recent/ticker-posts

मानेगाँव येथे 9 ऑगस्ट क्रांती व स्व. बाबुजी खवसकर स्मृति दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-श्री संत रविदास गृहनिर्माण संस्था लाखनीचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, दलित मित्र महाराष्ट्र शासन सन्मानित, *स्व. बाबूजी सितारामजी* खवसकर यांचे 26 वे स्मुती दिवस,आई रानुबाई सितारामजी  खवसकर यांचे 20 वे स्मृती दिवस त्यांचे समाधी स्थळ, मानेगाव( सडक )लाखनी येथे दिनांक 9ऑगस्ट 2026 रोजी (क्रांती दिवस ) साजरा करण्यात आला
       इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा, दिलासा ग्रुप, श्री संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज विभागीय सेवा संस्था, बाबूजी आई सेवा इत्यादीच्या वतीने बाबूजी आई यांचे सह हुतात्म्यांना  श्रद्धांजली देण्यात आली.
       समाधी पूजणानंतर वनभोजन करण्यात आले.
         याप्रसंगी रेड क्रॉस चे सर्व आजीवन सदस्य मुकुंद खवसकर सेवानिवृत्त नायब तहसीलदार, रामभाऊ ब्रह्मपूरकर, राजेश खवसकर  सौ. संगीता डहाके, सौ.पद्मा खवसकर  यांचेसह सौ संगीता खवसकर इत्यादी हजर होते.
       स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबूजी सितारामजी खवसकर 9 ऑगस्ट 2000 या क्रांती दिवशी स्वर्गलोकी प्राप्त झाले. त्यांचे ( आई-वडिलांचे ) जीवनावरील विशेष प्रकाश टाकत त्यांनी आयुष्यात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणजे,,, त्यांचा *स्मृति दिवस* तसेच 2026 मध्ये त्यांची *शतक वीर (100 वी )* जयंती आम्हा परिवारास नवीन ऊर्जा देत आहे  अशा शब्दात संचालन कर्ते राजू खवसकर यांनी माहिती प्रदर्शित केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या