Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यदिनी पालकांना शाळेबाहेरच उभे ठेवले

 सेन्ट ॲनेस हायस्कुल सुमठाणा भद्रावतीच्या मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी


चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर  

चंद्रपूर : भद्रावती येथील सुमठाणा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सेन्ट ॲनेस हायस्कुल  येथे झालेल्या झेंडा वंदन कार्यक्रमात शाळेतील मुलांच्या पालकांना शाळेच्या आत प्रवेश न देता बाहेरच उभे ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे पालकांमध्ये नाराजी असून मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्राप्त मिळालेल्या माहिती नुसार 15 ऑगस्ट  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपल्या पाल्या सोबत गेलेल्या पालकांना  सजवलेल्या शाळेच्या  बाहेरच  पालखांना रोखल्याने मोठ्या संख्येने पालक उभे होते. शाळेच्या आत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सुरू असताना पालकांना आत का येऊ दिले गेले नाही हे लोकशाही विरोधी असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे..
स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण असून यावेळी पालकांना आपल्या पाल्यासोबत झेंडा वंदनात सहभागी होता यावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र शाळा प्रशासनाने पालकांना गेटबाहेरच थांबविल्याने अनेक पालक नाराज झाले व पालकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. "आम्ही झेंडा वंदनासाठी शाळेत आलो होतो, पण आत जाऊच दिले नाही" अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली.

शिक्षण विभागाच्या नियमानुसार स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे सार्वजनिक कार्यक्रम आहेत. यात पालक, ग्रामस्थ व सर्व नागरिकांना सहभागी होण्याची मुभा असते. असा नियम ईतर कोणत्याच शाळेत  नाही. मग याच शाळेत कसा काय? असा पालकांना प्रश्न पडला आहे.

या प्रकरणी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सबंधीत पालकांनी  लेखी तक्रार दिल्यास मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

या प्रकरणी मुख्यध्यापकावर पुढिल कारवाई होऊ शकते
कारण दाखवा नोटीस - मुख्याध्यापकांना लेखी खुलासा मागवला जाऊ शकतो, चौकशी समिती - तालुका स्तरावर चौकशी होऊन अहवाल सादर केला जाऊ शकतो, प्रशासकीय कारवाई  - दोषी आढळल्यास वेतनवाढ रोखणे, निलंबन किंवा बदली सारखी कारवाई होऊ शकते.

--------------------------------------------------

प्रशासनाची प्रतिक्रिया अपेक्षित

या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्व शाळांना सूचना द्याव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या