Ticker

6/recent/ticker-posts

तथागत विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा : तथागत विद्यालय, केसलवाडा येथे देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 7.50 वाजता संस्थेचे पदाधिकारी श्री. डॉ. घनश्यामजी वघरे साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पद्माकर सावरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच कवळूजी फुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंदजी गजभिये, सरपंच श्री. धनराज वलके, उपसरपंच श्री. भिमराव बारसागडे, माजी पोलीस अधिकारी श्री. विजय सलामे, वाहाणे कातूर्ली तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. नंदुजी फुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात वंदे मातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. तसेच पावसाची संततधार सुरू असतानाही विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून देशभक्तीचा उत्साह कायम ठेवला.

कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक श्री. धनराज भोयर, श्री. प्रदीप गोंडाने, श्री. प्रमोद गाडेकर, कु. जयेश्री कुंभार, कु. रुचिता वाहाणे व कु. सृष्टी गजभिये, शिक्षकेतर कर्मचारी श्री. भाऊराव गजभिये (कनिष्ठ लिपिक) व श्री. देवानंद देशमुख (परिचर) उपस्थित होते.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. जयपालजी वनवे साहेब तसेच कार्याध्यक्ष श्री. दुर्योधनजी सयाम यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून विद्यार्थी, शिक्षक व विद्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व राष्ट्रप्रेमाची भावना दिसून आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या