Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूरच्या रुपेश कुतरमारे यांची राष्ट्रीय सोशल आयकॉन पुरस्कारासाठी निवड; सामाजिक कार्याचा होणार गौरव


प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

चंद्रपूर : देशभरातून प्राप्त झालेल्या तब्बल ३५५ नामांकनांमधून अंतिम १५ पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून, चंद्रपूरचे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा गोंडवाना  विद्यापीठाचे उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त रुपेश पांडुरंग कुतरमारे यांची प्रतिष्ठित National Social Icon Award साठी निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.

Youth Socialgram Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात देशभरातील निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव केला जाणार आहे. सामाजिक सेवा, युवक सहभाग, पर्यावरण संवर्धन, जनजागृती आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये कुतरमारे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची अंतिम १५ पुरस्कारार्थींमध्ये निवड करण्यात आली.या सामाजिक  कार्यामध्ये माझे गुरुजन, आई -वडील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अधिकारी आणि आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन यांच्या सहकार्याने या पुरस्काराचा एक भाग झालो सोबतच युथ सोशलग्राम फाउंडेशन राष्ट्रीय समिती  यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आले. 

Youth Socialgram Foundation ची स्थापना २०२१ मध्ये झाली असून, २०२६ मध्ये संस्थेच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पुरस्काराचा भव्य सोहळा सप्टेंबर २०२६ मध्ये दिल्ली-NCR येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला संसदेतील मंत्री, आमदार, खासदार, तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत देशभरातून निवड झालेल्या १५ पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येणार आहे.

देशभरातील ३५५ नामांकनांमधून अंतिम १५ जणांमध्ये स्थान मिळवत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने रुपेश कुतरमारे यांच्या सामाजिक कार्याला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मिळणारा हा राष्ट्रीय सन्मान रुपेश कुतरमारे यांच्या सामाजिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, युवकांना समाजसेवेसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या