ग्लोबल वॉर्मिंगमुळे परिसरातील शेती धोक्यात
साकोली: रवि भोंगाने
" माकडा माकडा खूप खूप
झाडे लावा खूप खूप
कावळा करी काव काव
माणसा माणसा झाडे लाव "
या छोट्याशा कवितेच्या ओळीने सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात माहोल केलेला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. वैयक्तिक स्तरावर आणि शासन स्तरावर खूप मोठी वृक्ष लागवडची चळवळ राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे धडाक्यात उपक्रम राबविणे सुरू आहेत. अशातच ' माकडा माकडा खूप खूप, झाडे लावा खूप खूप. कावळा करी काव काव, माणसा माणसा झाडे लाव ' या चार ओळीने धुमाकूळ घालून नागरिकांपर्यंत पर्यावरणाचा संदेश पेरलेला आहे. तर दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे परिसरातील शेती येणाऱ्या काळात बेभरवशाची ठरू लागलेली आहे. त्याची चिन्ह आतापासूनच दिसायला लागलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या मदतीने लहान मुलांसाठी जिथे जागा मिळेल तिथे फळांची झाडे लावावी असे आवाहन निसर्गप्रेमी तथा पक्षी तज्ञ किरण पुरंदरे यांनी नुकतेच सोशल मीडियावरून केलेले आहे. जिथे जागा दिसेल तिथे आपल्या देशात, परिसरात वाढणारी फळाची झाडे लावावी. येणाऱ्या काळात मुलांच्या हातात जंख फूड पॉकिट ऐवजी दोन्ही हातात फळे दिसायला हवी. असे स्वप्न प्रत्येकाचे असायला हवे. लहान मुलांनी फळांचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा. निसर्गात रमतांना धडपडले पाहिजे, पडले पाहिजे, फळे फुलांचे डाग कपड्यावर पडलेच पाहिजे. तरच आपण निसर्गाचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेत असतो. अनेक मुलांना जंख फूडमुळे कालांतराने आरोग्याच्या प्रश्न सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक सजग पालकांनी आपल्या पाल्यांच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे. जंख फूडपासून होणारे दुष्परिणाम आणि फळांपासून मिळणारे फायदे या दोन्ही गोष्टीतील फरक आपल्या पाल्यांना समजावून सांगितले पाहिजे. नुकतेच अन्न व औषध प्रशासन ( एफडीए ) विभागाचे आयुक्त तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शाळा परिसराच्या चौफेर परिसरात ५० मिटरच्या आत जंख फूड विकण्यास बंदी घातलेली आहे. त्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकावर टाकलेली आहे. त्यामुळे जंख फूडमुळे किती घातक परिणाम होऊ शकते यावरून दिसून येत आहे.


0 टिप्पण्या