चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा ;-भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो.याच दिवशी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान (गोवालिया टँक) येथून महात्मा गांधींनी ब्रिटिशांना 'भारत छोडो' (चले जाव) असा अंतिम इशारा देत देशवासीयांना 'करो या मरो' चा प्रेरणादायी नारा दिला होता.या दिवशी, देशभरात आंदोलनाची लाट उसळली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवीन दिशा मिळाली.या आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी स्वतःला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी पुढे आले आणि अनेकांना त्यासाठी बलिदानही द्यावे लागले. क्रांती दिवस आपल्याला त्या शूरवीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आणि देशभक्तिपर गीते आयोजित केली जातात. हा दिवस आपणास देशभक्तीची प्रेरणा देतो आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला कर्तव्यपथावर ठेवतो. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महात्म्यना आदरांजली वाहनकरिता ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भंडारा शहरातील छोटा बाजार येथील सहित भगतसिंग यांच्या पुतळ्याला मालदार पण करून अभिवादन करण्यात आले आणि क्रांती दिवस साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बिरसा मुंडा यांना सुद्धा अभिवादन करण्यात आले.यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते, प्राध्यापक राजपूत सर,दिलीप उमाळे,संजय खंडाईत,संजय वाघमारे,अमित मेहर,सुरेंद्र मोटघरे, नामदेव धकाते,मनीषा भांडारकर आणि वार्डातील अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या