सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज
अकोला:- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 158 अहवाल प्राप्त झाले. त्यात २६ जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून एक असे एकूण नऊ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला, तर आठ जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 26 व खाजगी 9)35+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 35.
आरटीपीसीआर ‘35’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 12 महिला व 14 पुरुष रुग्णाचा समावेश असून तालुकानिहाय पॉझिटिव्ह याप्रमाणे: बाळापूर येथील दोन, मुर्तिजापूर येथील दोन, तेल्हारा येथील एक, पातूर येथील एक, अकोला ग्रामीण येथील दोन तर उर्वरित 18 जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. तसेच नऊ रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
नऊ जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात नऊ रुणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘151’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65602(49509+15102+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 151 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील 25 जण रुग्णालयात दाखल तर अन्य 126 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


0 टिप्पण्या