द्रोणाचार्य कोळी जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण लातूर
मो.9822041174
लातूर : शनिवार दि.16 जुलै रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील शेतकऱ्यांनी श्वान पथकांच्या तावडीत सापडलेल्या हरिणाच्या पाडसाला वाचवून त्यांच्यावर उपचार करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोकळगाव येथील शेतकरी किरण उजने यांच्या शेतात एका हरिणाच्या पाडसाचा श्वान पथकांनी हल्ला करून पाठलाग करत असतानाचे पाहून,तेथील स्थानिक शेतकरी किरण उजने व रमेश मेहकरे यांनी पाठलाग करून श्वान पथकाच्या तावडीतून हरिणाच्या पाडसास वाचवले व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून, स्थानिक पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांच्याशी संपर्क साधला.पत्रकार यांनी निलंगा येथील वनविभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, तात्काळ वनविभाग अधिकारी प्रेमनाथ गायकवाड यांच्या ताब्यात दिले.यावेळी माजी सरपंच किरण उजने,अनिल उजने, दिपक लिंबाळे, पत्रकार द्रोणाचार्य कोळी वसंतराव मंजुळे आदींची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या