संजय ठोंबरे जिल्हा विशेष प्रतिनिधि अहमदनगर
अहमदनगर : झेंडीगेट येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात आल्यानंतर मन प्रसन्न होते आणि त्यातूनच येथील दैवत जागृत असल्याची प्रचिती येते असे उद्गार संगीतमय सुंदरकांड पठणकर्त्या महाराष्ट्र मीरा संत प.पु.सुश्री अलकाश्रीजी यांनी काढले.नगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अलकाश्रीजींचे आगमन झाले होते.यावेळी आवर्जून त्यांनी या मंदिराला भेट दिली.
यावेळी मंदिराचे प्रमुख रामदासजी कावट यांनी मंदिरात चालणाऱ्या नित्य व नैमित्तिक उपक्रमांची माहिती दिली.यावेळी संगीतमय सुंदरकांड पठणकर्त्या संत पपु श्री अलकाश्रीजींचा सत्कार ज्योती प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी रामदासजी कावट,पापालाल लढ्ढा व अन्य महिला व पुरुष भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरेश झंवर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.


0 टिप्पण्या