माडगी येथील घटना
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-लाखनी तालुक्याचे सीमावर्ती भागातील पिंपळगाव येथून सकाळ पाळीचा रोवणा आटोपून स्वागवी माडगी येथे ट्रॅक्टर ट्रालीने परतीचे प्रवासात वळणावर ट्रॉली पटल्याने २१ महिला जखमी झाल्याची घटना तिरुपती विद्यालय
माडगी जवळ गुरुवार(दि.१४) सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास घडली. अंबाबाई अर्जुन कांबळे(६५), छाया विजय रणदिवे(६०), छाया बळीराम नागपुरे(५५), पुष्पा लिहिनदास मेश्राम(५०), मुक्ता नारायण तिवाडे(७०), इंदिरा ईश्वर चौधरी(६५), सविता ईश्वर पाल(४५), भागरथा भागवत पचारे(६५), अर्चना रघुनाथ बोरीकर(३५), राजश्री पृथ्वीराज पडोळे(३५), सुनीता भागवत रणदिवे(५५), वनिता महेश बोरीकर(३२), देवांगना हेमराज घरोटे(२१) अशी जखमींचा नावे असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचार सुरू आहे. काही महिला मजुरांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्रफुल समरीत यांचे पिंपळगाव शेतशिवारात सकाळ पाळीत धानाच्या रोवणी चे कामाकरीता माडगी येथील २१ महिला मजूर ट्रॅक्टर ने आल्या होत्या परतीचे प्रवासात वळणावर चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी झाल्यामुळे २१ पैकी १३ महिला गंभीर जखमी झाल्या. याच वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत निंबार्ते आपले शेतातील रोवणी पाहण्या करिता गेले असता अपघातग्रस्त ट्रॉली चा आवाज झाल्याने ते घटनास्थळी पोहचले व अत्यवस्थ ४ महिला मजुरांना आपल्या चार चकित टाकून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे आणले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसन्नजीत बलवीर यांचेसह उपचारास सुरुवात केली. तो पर्यंत उर्वरित सर्व जखमी महिला मजुरांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी अंबाबाई कांबळे, छाया रणदिवे, छाया नागपुरे, पुष्पा मेश्राम, मुक्ता तीवाडे, इंदिरा चौधरी यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना सामान्य रुंगालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक माधव वनवे, पोलिस शिपाई नितीन बोरकर यांनी जखमींची विचारपूस केली. घटनास्थळ अड्याळ पोलिस ठाण्याचे हद्दीतील असल्याने अड्याळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक फौजदार गंगाधर आळे ग्रामीण रुग्णालयात आले. जखमींची विचारपूस करून बयान नोंदविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांचे मार्गदर्शनात अड्याळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


0 टिप्पण्या