Ticker

6/recent/ticker-posts

औरंगाबादेत 22 पासून होणार मराठवाड्यातील वेतन पडताळणी.


लातूर, उस्मानाबाद, हिंगोली , नांदेड आणि परभणीची पडताळणी 26 पासून
 
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

औरंगाबाद :-सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक औरंगाबादेत येत आहे. लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांसाठी 26 ते 30 नोव्हेंबर, तर औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील व तालुकास्तरीय सर्व कार्यालयांसाठी 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत मूळ सेवा पुस्तकांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे औरंगाबादच्या लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांनी कळविले आहे. दौऱ्याचे ठिकाण औरंगाबादचे वेतन पडताळणी पथक कार्यालय असणार आहे.
औरंगाबाद मुख्यालयी दौऱ्याच्या ठिकाणी 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणारे व झालेले अधिकारी तसेच कर्मचारी तसेच न्यायालयीन,मयत,लोकायुक्त प्रकरणे यांचे मूळ सेवापुस्तके प्राधान्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे. मराठवाडा विभागातील सर्व कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयातील 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणार व झालेले अधिकारी व कर्मचारी यांची मूळ सेवापुस्तके पडताळणीसाठी प्राधान्याने दाखल करावीत,असे आवाहनही श्री.सोनकांबळे यांनी केले आहे.
सेवापुस्तकात 20 जानेवारी, 2001 च्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार विहित जोडपत्र सेवा पुस्तकात जोडणे आवश्यक आहे. सेवा पुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना वित्त विभागाच्या 14 मे 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनिका प्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावयाचे आहे. त्याशिवाय मूळ सेवापुस्तके स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
 अधिकारी, कर्मचारी यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेली असल्यास तसेच कालबद्ध आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ दिलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांच्या मूळ सेवा पुस्तकात घेणे आवश्यक असल्याचेही श्री. सोनकांबळे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या