Ticker

6/recent/ticker-posts

अखेर वीज जोडणी धारकावर गुन्हा दाखल


मासलमेटा येथील प्रकार


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील मासलमेटा येथे वीज जोडणी नावाने असलेल्या इसमाने इलेक्ट्रिक डीपी वर वीज जोडणीत छेडछाड करण्याचे उद्देश्याने सांगितल्याने डीपी वरून खाली पडून ज्ञानेश्वर लक्ष्मण इसकापे रा. आलेसुर(५५) हा जखमी झाल्याने महावितरण चे कनिष्ठ अभियंता पिंपळगाव यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी कनेक्शन धारक हनिप भुरा(५५) रा. मासलमेटा यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
          हनिप भूरा यांचे नावाने मासलमेटा येथे वीज जोडणी असलेला इलेक्ट्रिक डि. टि. सी. क्रमांक ४७१९३३६ वर जखमी ज्ञानेश्वर इसकापे यास वीज जोडणी मध्ये काहीतरी छेडछाड करण्याचे सांगून त्याचा जीव किंवा सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या हयीगयीने कृती केल्याने त्याला विजेचा शॉक लागून तो खाली पाऊण गंभीर जखमी झाला. त्याला कनेक्शन धारकाने लाखनी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलें. पण प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. याबाबत माहिती होताच महावितरण कार्यालय पिंपळगाव/सडक चे कनिष्ठ अभियंता कमलेश्वर नवखरे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी हनिप भुरा(५५) मासलमेटा यांचे विरुद्ध अपराध क्रमांक २४९/२०२२ कलम ३३६ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार प्रमोद बागडे हे तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत आरोपीस अटक अथवा सूचना पत्र दिले गेले नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या