द्रोणाचार्य कोळी
जिल्हा प्रतिनिधी लातूर ग्रामीण
,9822041174
लातूर:निलंगा तालुक्यातील कोराळी येथील माजी सरपंच तथा महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. कल्पना गोपाळ गायकवाड यांना महाराष्ट्र लोकविकास मंच कार्य या संस्थेकडून इ. स. 2022 चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांच्या हस्ते बीड येथे देण्यात येणार आहे.
सौ. गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागातील अति दुर्गम गावातील सामाजिक कार्यकर्ती कल्पना गायकवाड ही या भागातील रणरागिनी ठरली. अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेली मागासवर्गीय कुटुंबातून उदय पावलेली, कल्पना गायकवाड हिला तिच्या कार्याची दखल घेत नोव्हेंबर 2022 मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वाशी मुंबई येथे झाशीची राणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर इ.स.2008 पासून च्या कार्याची दखल घेत त्यांना सामाजिक विकास संस्था बचत गटाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष माननीय श्री वाघ यांनी उस्मानाबाद येथे प्रथमच ग्रामसावित्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्काराचे या भागातील महिला
मंच च्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, सौ गायकवाड यांना त्यांच्या पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या