Ticker

6/recent/ticker-posts

ॲनिमिया टाळण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक : डॉ. विनायक चव्हाण

जनता कला व विज्ञान कालेज मध्ये ॲनिमिया विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 

संजय ठोंबरे , 9405400723
जिल्हा विशेष प्रतिनिधी , अहमदनगर 

अहमदनगर :ॲनिमिया टाळण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक  असुन दुधापासून बनवलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी, मटण इत्यादी चा आहारात समावेश  असणे गरजेचे. त्या सोबतच फळ वर्गीय आहारात संत्रा, मोसंबी, सपरचंद यासारखी फळ ही महत्वाची आहेत . असे प्रतिपादन रुईछत्तिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चे डॉ. विनायक चव्हाण  यांनी केले . अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या  रुईछत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात' प्राणीशास्त्र विभागाने  महाविद्यालयीन युवक व युवातीसाठी 'ॲनिमिया : कारणे व समाधान' या विषयावर मार्गदर्शन कार्यकामाचे आयोजन केले होते त्यात ते बोलत होते .
.
       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाबर अध्यक्ष स्थानी होते .
      
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय प्राणीशास्र विभागप्रमुख प्रा. ठाकरे एम. सी. यांनी करून दिला .

प्राचार्य डॉ. सुरेश बाबर यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले .

 
यावेळी  प्रा. काळे डी. बी., प्रा. गायकवाड डी. ए., प्रा. रनसिंग एम. व्ही., प्रा. पादीर ए. एन., प्रा. गोरे आर. एल., प्रा. कोलते ए. आर., प्रा. टकले एस. आर., प्रा. कोलते एस. ए., डॉ. ए. के. आढाव, डॉ. डी. एस. तळूले, प्रा. सोनवणे आर. सी., प्रा. भनगे एस. एस., प्रा. क्षीरसागर एन. बी.  प्रा. माने ए. एस.,  प्रा. शेळके एस. बी., प्रा. वाळके डी. बी. प्रा. निक्रड के. टी., श्री. हराळ एम.  ए., श्री. गोरे ओ. पी. इ. उपस्तिथ होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. पठारे पी. व्ही. यांनी केले . आभार उपप्राचार्य डॉ प्रा. सुपेकर आर. बी. यांनी मानले.

फोटो - 
रुई छत्तिसी ( ता . नगर ) येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयत आयोजित व्याख्यानात विद्यार्थ्या शी संवाद साधताना रुई छतिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विनायक चव्हाण. ( छाया चित्र - संजय ठोंबरे )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या