Ticker

6/recent/ticker-posts

कळंब शहरातील इंदिरा नगर येथील असंख्य महिलांचा भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256


उस्मानाबाद :- धाराशिव :- दिनांक 29 नोव्हेंबर कळंब शहरातील इंदिरानगर, शेरे गल्ली भागातील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वनिताताई कठाले यांनी पक्षाच्या नेतृत्वावर व आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन असंख्य महिलां समवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

त्यांच्या समाजसेवेचा अनुभव राजकारणाच्या माध्यमातून जनकल्याणासाठी कामा येईल अशी खात्री आहे. यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नूतन महिला जिल्हाध्यक्षा श्री.नंदाताई पुनगुडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत लोमटे, श्री.अशोक क्षीरसागर, श्री.राहुल लंगडे, श्रीमती कविताताई जाधव, श्रीमती धानुबाई डोके, श्रीमती आशाताई बारसकर, श्रीमती सीताबाई माने, श्रीमती रेश्माताई शेख, श्रीमती सुलक्षणाताई गांजेकर व असंख्य महिलांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या