Ticker

6/recent/ticker-posts

जिंतूर नारी मंचची राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे साकडे

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


परभणी :-दिल्ली येथील श्रद्धा वालकर हिचा खून करणाऱ्या आफताब पुनावाला यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिंतूर नारी मंच च्या वतीने करण्यात आली आहे.
         आज दि.२१ वार सोमवार रोजी तहसीलदार मार्फत महामही राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिल्ली येथील घडलेल्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेत बळी पडलेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा निषेध करत निवेदनावर सदर घटनेचा तपास राष्ट्रीय तपासणी यंत्रणेकडून करण्यात यावा, सदरील खटला जलद गतीने न्यायालयासमोर चालून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, मुंबई येथील फॉरेन्सिक लॅब तज्ञाची नियुक्ती या प्रकरणाच्या तपासासाठी करावी, आरोपीला कायद्यातील कलम ३०२ प्रमाणे मनुष्य वधाचा गुन्हा व कलम २०१ प्रमाणे पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा तात्काळ द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर जिंतूर नारी मंचाच्या सौ. डॉ. सविता वाघमारे,सौ. योगिता अनिल संगवई, सौ.अनिता कौसडीकर, सौ.मीना भोंबे,सौ. रंजना भोंबे, सौ.राधा काबरा, सौ.मनीषा पेशकर, सौ.सुनिता देशपांडे, सौ.तोडकर, सौ. खपरखुंटीकर सौ. रत्नमाला तोडकर,सौ. संगिता कपाळे, सौ. माधुरी देशपांडे, सौ. शहाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या