कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघटना शाखा लाखनी चे वतीने पोलिस ठाणे लाखनी येथे सोमवार(ता.२१) रोजी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे अध्यक्षतेखाली पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव सुरेश मते, तालुकाध्यक्ष सेवक टिचकुले, सचिव कटरे, उपाध्यक्ष शेंडे मॅडम यांचे प्रमुख उपस्थित सेवानिवृत्त पोलीस पाटील तुकाराम श्रीराम बारसागडे मानेगाव/सडक, पांडुरंग विठोबा सार्वे चिचटोला यांचा सेवानिवृत्तीपर शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.


0 टिप्पण्या