सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर
हजरत टिपू सुलतान यांची जयंती देशभर साजरी होत असताना खर्डा येथे दिनांक 22 नोव्हेंबर 22 रोजी जुन्या ग्रामपंचायत समोर भव्य अशा व्यासपीठावर टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रवींद्र सुरवसे, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, भाजपचे बाजीराव गोपाळघरे,नाना गोपाळघरे, चंद्रकांत गोलेकर, भागवत सुरवसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, गोटू कांबळे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, वैजीनाथ पाटील,प्रकाश गोलेकर, राजू मोरे, इस्माईल शेख, पाटोद्याचे माजी सरपंच अन्सार भाई पठाण,पत्रकार दत्तराज पवार,बाळासाहेब शिंदे,संतोष थोरात,अनिल धोत्रे इ. उपस्थित होते.
यावेळी हजरत टिपू सुलतान यांच्या जीवन परिचय व त्यांनी इंग्रजांविरुद्ध केलेला उठाव तसेच त्यांच्या सामाजिक कामाची व सर्व धर्मीय लोकांबरोबर त्यांनी ठेवलेले संबंध याविषयीची माहिती देण्यात आली. याप्रसंगी जवळ्याचे ग्रामपंचायत सदस्य नयुमभाई पठाण, पाटोद्याचे माजी सरपंच समीरभाई पठाण, सरपंच गफ्फार भाई पठाण,सुनील लोंढे,विजयसिंह गोलेकर, रवी सुरवसे, आसाराम गोपाळघरे, इत्यादींनी आपल्या भाषणातून हजरत टिपू सुलतान यांच्या जीवनकार्याचा उलघडा केला.
कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमास सर्व धर्मीय व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी टील्लू पंजाबी, शौकत शेख, शाहरुख शेख, जावेद सय्यद, राजू जीकरे,शेरखान पठाण, बब्बू शेख, जाकीर शेख, खाजाभाई कुरेशी, जमीर सय्यद, बाळू आतार,खालील आतार,अमन शेख, जुनेद सिकलकर, सोनू मोमीन, साहिल बागवान, आयान शेख, रेहान बागवान, सुलतान शेख, लूकमान बागवान, साहिल आतार व सर्व कार्यकर्ते खर्डा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमा घोडेराव यांनी केले तर आभार शहाबाज सय्यद सर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.


0 टिप्पण्या