धम्मदिप साखरे,लाखांदूर तालुका प्रतिनिधी मो. नंबर8698390104
लाखांदूर:-दिनांक 26/11/2022 (शनिवार) दुपारी 03.00 वाजता सर्किट हाऊस भंडारा येथे *बहुजन समाज पक्षातर्फे संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न* झाला . चालायचे कशा पद्धतीने, बोलायचं कशा पद्धतीने, जगायचं कशा पद्धतीने, वागायचं कशा पद्धतीने याची नियमावली ज्या ग्रंथात नमुद केलेली आहे. ते ग्रंथ म्हणजेच "भारतीय संविधान"आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप मोटघरे होते, या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष पाम्बीर्द, जिला उपाध्यक्ष प्रशान्त रामटेके , कोषाध्यक्ष रवि गजभिए, पुर्व प्रभारी के एल गजभिए, मोरेश्वर गेडाम, बबन नागरले, विक्रांत भवसागर, नेमीचंद बागड़े, बसपा शहराध्यक्ष अरविन्द बंसोड़, शहर उपाध्याक्ष मनीष राणे, शहर महासचिव नरेन्द्र रामटेके, शहर सचिव शुक्रचार्य डोंगरे, अचल दामले सर, कुंजन शेंडे, रविकांत गजभिये, सिद्धार्थ शेंडे , नागरत्न रंगारी, दिवाकर निमजे, उपस्थित होते.
कार्यक्रमातील विशेष पाहुण्यांनी राज्यघटनेतील महत्त्वाच्या कलमांची सविस्तर माहिती दिली. संपूर्ण संविधानाची भारतात जोरदार अंमलबजावणी कशी करता येईल यावरही चर्चा केली.
त्याचबरोबर पे बॅक टू सोसायटी आणि समाजाला आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा झाली.


0 टिप्पण्या