Ticker

6/recent/ticker-posts

रेंगेपार/कोठा परिसरात बिबटाची दहशत

अनेक पाळीव प्राणी केले फस्त

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- कोका वन्यजीव अभियारण्याच्या बफरझोन मध्ये वसलेल्या वन व्याप्त दुर्गम परिसर म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या रेंगेपार/कोठा परिसरातील अनेक गावात रात्रीचे सुमारास जाऊन बिबटाने अनेक पाळीव प्राण्याची शिकार करून पशू पालक शेतकऱ्यांचे नुकसान केले असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या धान मळणी चा हंगाम सुरू असल्याने मजूर शेतावर काम करीत असतात त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. 
           वन परिक्षेत्र लाखनी चे अधिनस्त वनरक्षक बीट लाखनी आणि गडेगाव चे अधिनस्त रेंगेपार/कोठा, गोंडसावरी, सोमलवाडा, सोनेखारी, किंन्हीं, दैतमांगली, चिखलाबोडी इत्यादी गावांचा समावेश होतो. हा परिसर कोका वन्यजीव अभियारण्याचे सीमेवर येतो. या परिसरात अनेक गावात मोठ्या झाडांचा जंगल व झुडपी जंगल असल्यामुळे वनव्याप्त दुर्गम परिसरात म्हणून ख्याती प्राप्त आहे. या जंगलात तृणभक्षी प्राणीसह हिंस्त्र श्वापदांचाही अधिवास असला तरी या वनक्षेत्राचे रक्षणाची जबाबदारी क्षेत्र सहाय्यक जे.एम. बघेले, वनरक्षक के.एस. सानप, कुमारी एम.एल. शहारे ह्या २ वनरक्षकासह काही रोजंदारी वन मजुरावर आहे. मनुष्यबळाअभावी या वन क्षेत्राचे संरक्षण अशक्यप्राय बाब आहे. या परिसरातील अनेक गावात रात्रीचे सुमारास बिबट गावात येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करतो. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील पंधरवाड्यापासून या परिसरातील सर्वच गावात पाळीव जनावरे, शेळ्या, कुत्रा, रेडकु इत्यादींची शिकार केली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबटाचे दिवसाही अनेकांना दर्शन झाल्याचे विश्वसनीय वृत्त असून सध्या रेंगेपार/कोठा परिसरातील अनेक गावात धानाचे कळप गुंडाळणे व धानाची मळणी चा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्ग दिवसभर शेतात असतो. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या