कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- विठठल रुखमाई विद्यालय भूगाव/मेंढा येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी कार्यक्रम सोमवारी(ता.२८) साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल सुपारे, तर प्रमुख पाहुणे सहाय्यक शिक्षक प्रमोद ठाकरे, दादाराम मोहतुरे, देवेन्द्र हटवार, घनश्याम खंडाईत तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मुकेश साखरे, पाडूरंग दोनोडे,चंद्रमणि हुमने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विदयार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शनातून सुनिल सुपारे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावरील अनेक प्रसंग व समाज सुधारनेचे त्यांचे धेय्य, त्यांचे कार्य यावर सविस्तर उदाहरणासह प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन कावेरी कावरे हिने तर आभार प्रियंका बारस्कर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकत्तेर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी योगदान दिले.


0 टिप्पण्या