दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
कोल्हापूर :-करवीर तालुक्यातील महे येथे वर्षानुवर्षे गावातील गटारींचे जाणारे सांडपाणी अडवल्याने , दूषित पाणी लोकवस्ती व प्रमुख रस्त्यावर साचू लागले आहे . दरम्यान आरोग्याचा प्रश्न मांडून यासाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले होते . या प्रश्नावर स्थानिक प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला . मात्र यावर मार्ग काढता न आल्याने महेतील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . संबंधिताच्या तक्रारीवरून बांधकाम विभागाने पूर्वीपासून असलेले गटारींचे नळे काढले आहेत . त्यामुळे वस्तीत सांडपाणी साचू लागले आहे , असे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे . एकीकडे सांडपाणी अडवणूक तर दुसऱ्या बाजूला आंदोलन अशा दुहेरी कोंडीत गटारीचे पाणी सोडण्यावर मार्ग काढणे आव्हान झाले आहे . त्यामुळे सांडपाणी प्रश्न कळीचा मुद्दा होऊन बसला आहे . दूषित पाणी लोकवस्तीत जात आहे . यामुळे आरोग्य व प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे . सांडपाण्यामुळे राजकीय वातावरण गढूळ होत आहे . या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून हा प्रश्न लावावा , अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे .


0 टिप्पण्या