दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
नांदेड:-मोटार सायकल वरून येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन करणाऱ्या कोंडवे ता . सातारा येथील दोघांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इंद्रजीत गुरव वय 24 रा . कोंडवे व अभिजीत महामुनी वय 27 रा . कोंडवे अशी संशयीतांची नावे आहेत . पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की दु . 2 वा . फिर्यादी या आपल्या घराच्या बाहेर उभ्या असताना मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरी करून नेले त्यानुसार कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा नितीन सावंत व डीबी पथकाने तपास सुरू केला घटनास्थळाची पाहणी करून व गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा इंद्रजीत गुरव व अभिजीत महामुनी यांनी केल्याचे स्पष्ट झाले यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले या कारवाईत पोनि . विशाल कदम , सचिन साळुंखे , समाधान शेडगे , अविनाश घाडगे , सुशांत कदम , महेश पवार यांनी सहभाग घेतला .


0 टिप्पण्या