दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
मुंबई :-पनवेल येथील तडीपार गावगुंड जगदीश गायकवाड या विकृत समाजकंटकाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर परिवाराबाबत जहरी गरळ ओकली असुन राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडवुन दंगली घडवण्याच्या दृष्टिकोनातून सदरी निच कृत्य करण्यात आले आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरील जगदीश गायकवाड यांस शोधुन जेरबंद करावे तसेच याच्या सर्व गैर व्यवहाराची चौकशी करावी अशी तक्रार ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरवादी / संविधानवादी चळवळीतल्या सर्व बंधु भगीणींना सुचित करण्यात येत आहे की सदरील प्रकरण हे आपल्या पक्षाची यशस्वीरित्या होणा-या पुढील वाटचाल रोखण्याकरीता आखलेले षड्यंत्र असण्याची शक्यता लक्षात घेता कुठे ही अनुचित प्रकार घडु नये याची खबरदारी घ्यावी अश्या सुचना पक्ष श्रेष्ठींच्यावतिने देण्यात आल्या आहेत.


0 टिप्पण्या