आई बाप हेच आपले नातेवाईक,भाऊ बहिण , शेजारी यांचेशी जसे वागतात, तेच संस्कार मुलांवर होतात.कौटुंबिक संस्कार जास्त प्रभावशाली असतात.तशीच पोरं वागतात.आई बाप बदमाषी करीत असतील तर पोरं ही करतीलच.
जावई आपल्या आईबाप,भाऊ बहिण यांचा सांभाळ करतो म्हणून सासू सासऱ्यांनी खूप द्वेष केला.जावईची टिंगळ, टवाळी ,हेटाळणी केली.तोच तमाशा मुलगा पाहात होता.तेच संस्कार त्याचेवर झालेत.आता तो लग्न करून बायकोला घेऊन वेगळा राहातो.त्याचे म्हातारे आईबाप एकटे राहातात.आता तिच म्हातारी माणसे जावईला सांगतात, आमच्या मुलाला शिकवा.काय शिकवू? माझ्या चांगुलपणाचा, आज्ञाधारक पणाचा तुम्ही तर तिरस्कार केला.मी सगळे सहन केले.पण कर्तव्य निभावले.तुम्ही मला चुकीचे बोलले,म्हटले,तेच तुमच्या पदरात पडले.आता तुमच्या मुलाला सांगून बदल होणार नाहीत.त्यापेक्षा एखादा चांगला मुलगा दत्तक घ्या.जो तुम्हाला म्हातारपणात सांभाळू शकतो.चांगली मुले आहेत.तुम्ही ओळखा,पारखा.स्विकारा.दत्तक घ्या.आतापर्यंत चुकले तर किमान आता दुरूस्ती करा.बिघडलेल्या,वातरलेल्या मुलांवर जास्त प्रेम करू नका.मुलगा झालाच नाही,असे समजा.चांगला मुलगा दत्तक घ्या.आहे ते जीवन चांगले जगून घ्या.
हाच एक पर्याय आहे.जो शक्य आहे.चांगला आहे.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या