रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई:- - हनुमान नगर, राघव वन बिल्डिंग शेजारी, कुर्ला (पूर्व) येथे 21 नोव्हेंबर 22 रोजी रात्रीचे 12 ते 1 च्या सुमारास सुमारे तासभर घरगुती LPG गॅस सिलेंडर लिकेजचा उग्र वास येत होता. पण कोणालाच ठाऊक नव्हते कोणाच्या घरी सिलेंडर लिकेज आहे व वास कुठून येतं आहे. वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका शिक्षण समिती प्रमुख किरण हिरवे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नका कोणताही प्रकारे अग्नि पेटून नका अशा सूचना दिल्या,
ताबडतोब त्यांनी सदर घटनेची माहिती अग्नीशामक अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी वेळेवर येऊन लिकेज असलेल्या सिलेंडरचा शोध घेऊन तो सिलेंडर मानवीवस्ती पासून दूर घेऊन गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. वंचितचे किरण हिरवे यांनी वेळीच समय सुचकता दाखवल्यामुळे कित्येक नागरिकांचे प्राण वाचले याबद्दल त्यांचे सर्व नागरिकां कडून कौतुक करण्यांत येतं आहे.


0 टिप्पण्या