चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) संपादक महा चित्रा न्युज मो ८८८८११७९७५
नांदेड-: मुदखेड सिद्धिविनायक हॉस्पिटल मुदखेड डॉ. अनिता तोटावाड मॅडम यांच्या हॉस्पिटल मध्ये जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगट असणारा आढळला रुग्ण त्या रुग्णाचे नाव कायरव राहिरे. वय 14 महिने रा. डोंनगाव येथील रहिवाशी आहे.
त्या बाळाला हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉ. यांनी सांगितले बाळाला रक्त चढवावे लागते. असे सांगताच रुग्णाचे वडील मुदखेड ते नांदेड येऊन रक्ताची तपासणी केली असता त्यांना O+ve असे सांगण्यात आले, पण तो रक्तगट कोणत्याच रक्तगटाशी जुळत नव्हता मग त्यांनी जीवन आधार ब्लड बँक नांदेड येथे त्या रक्ताची तपासणी केली असता, तो रक्तगट होता अत्यंत दुर्मिळ रक्तगट म्हणजेच बॉम्बे ब्लड ग्रुप आपणास माहीती असणारे रक्तगट 4 आहेत, पण मला माहिती असणारे रक्तगट सात आहेत.
बॉम्बे ब्लड ग्रुप बदल मुंबई येथील. डॉ. वाय.एम.भेंडे यांनी ई. स. 1952 साली ह्या रक्त गटाचा शोध लावला त्यामुळे त्याचे नाव बॉम्बे ब्लड ग्रुप असे देण्यात आले आहे.
मी. माधव एम सुवर्णकार. रा. इटग्याळ.(प.मु) येथील रहिवाशी आहे.
जेंव्हा मला स्वतःला समजले माझे रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, तेंव्हा पासून मी रक्तदानाची चळवळ सुरू केली आहे. तसेच ह्या क्षेत्रात घेऊन चालणारे माझे गुरू श्री. विक्रम यादव सर. बॉम्बे ब्लड ग्रुप चे अध्यक्ष. व श्री. एन. टी.सर बरबडा येथील माझे गुरू व दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते ह्यांचा पण खूप मोठा मला पाठिंबा असतो.
मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा रक्तगट माहीती असणे आवश्यक आहे.
चला तर मग करूया दान रक्ताचे वाचूया प्राण रुग्णाचे.
आटत नसतो कधी रक्ताचा झरा तीन महिन्यांनी रक्तदान करा.
आज माझे 60 वे रक्तदान पूर्ण झाले आहे.
ज्यांनी मला जन्म दिला आहे त्या माता पित्यांना मी नत मस्तक होऊन वंदन करतो आहे.
व पुढील अशीच सेवा माझ्या हातून घडो हिच मी त्या माझ्या आई वडिलांना प्रार्थना करतो आहे.
तसेच आज मी रक्तदान करताना माझ्या सोबत माझी विद्यार्थिनी पण उपस्थित होत्या. कु. एस. एस.
बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन इंडिया:-
संपर्क - *8888308339*


0 टिप्पण्या