सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :
देवदूताप्रमाणे जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या डॉक्टरांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. - मा.सरपंच समीरभाई पठाण
जामखेड शहरातील महाराष्ट्र बँकेशेजारी असलेले प्रसिध्द हॉस्पिटल जीवनसाई चे संचालक डॉ सादेख पठाण यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच समिरभाई पठाण यांनी शुभेच्छा देताना आपल्या मनोगता मध्ये म्हणाले, कोरोना महामारी च्या काळामध्ये देवदूताप्रमाणे जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या डॉक्टरांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. जर आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि हीच रुग्णसेवा डॉ सादेख पठाण हे देखील गरजू रुग्णांन पर्यंत पोहचुन मदतीचा हात देत आहेत .
पुढे बोलताना सरपंच पठाण म्हणाले,जीवनसाई हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना 24 तास योग्य सेवा देतात. त्यांच्या रुग्णालयात सध्या आय सी यु, अस्थिरोग विभाग, जनरल सर्जरी, सह अत्यावश्यक सेवा अल्पदरात देण्यात येतात. रुग्णांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी डॉक्टरांचे आरोग्य चांगले राहो हीच सदिच्छा.
यावेळी ,माजी सरपंच समिरभाई पठाण, धडाडीचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते गफ्फार भाई
पठाण,खालेदभाई पठाण, मोसीनभाई पठाण, उमरभाई शेख, साहील पठाण, अनिस पठाण, जिब्रान शेख, डॉ भोसले, कांबळे मॅडम, लताताई सकट, पप्पुभाई सय्यद, धनराज पवार अविनाश बोधले सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सादेख पठाण यांना राजकीय, सामाजिक व प्रतिष्ठित व्यापारी व मित्र परिवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात शुभेच्छा देण्यात आले.


0 टिप्पण्या